वाढत्या आधुनिकीकरणामुळे महिलांचे पारंपरिक खेळ संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर – प्रियांका गायकवाड
करमाळा प्रतिनिधी :- श्रावण मासानिमित्त करमाळा शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख तथा शिवकन्या सुरक्षा समितीच्या संस्थापिका प्रियांका गायकवाड यांनी महिलांसाठी विविध पारंपरिक खेळाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी गायकवाड म्हणाल्या की, श्रावण मास हा हिंदू धर्मातील पवित्र महिना म्हणून गणला जातो या महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील श्रावण महिन्यातील पारंपरिक खेळ हे वाढत्या आधुनिकीकरणामुळे व फॅशन च्या जमान्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे आम्ही जुनी परंपरा जोपासण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमामध्ये भरपूर महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम खूप उत्साहात पार पाडला. यापुढेही महाराष्ट्राची परंपरा जोपासण्यासाठी मी व माझ्यासह माझ्या सर्व सहयोगी महिला सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन यावेळी गायकवाड यांनी केले. याप्रसंगी किल्ला विभागासह करमाळा शहरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
