सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शंभूराजे जगताप यांचा टीडीएफतर्फे गौरव टीडीएफचे पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल टीडीएफ संघटना व माध्यमिक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
टीडीएफ संघटनेचे पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या पुढाकाराने आयोजित या सत्कार समारंभात पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते शंभूराजे जगताप यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी टीडीएफ संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम हानपुडे उपस्थित होते. जगताप यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड होणे ही करमाळा तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असल्याचे मुकुंद साळुंखे सर यांनी सांगितले. त्यांच्या अनुभवाचा जिल्ह्यातील सहकारी संस्था, शेतकरी आणि सभासदांना लाभ होईल, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
या प्रसंगी टीडीएफ संघटनेचे उपाध्यक्ष संजय सोनवणे सर, करमाळा तालुका अध्यक्ष किरण किरवे सर, प्रताप बरडे सर, यशवंत तिवारी सर, सुदाम कुरडे सर, विजय माने सर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी शंभूराजे जगताप यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


