जिल्हा परिषद शाळांत पहिलीपासून सेमी इंग्रजीसाठी दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची आढावा बैठक आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणीला गती देण्याचे नियोजन;
;
करमाळा प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावावी, यासाठी करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्रजी शिक्षण सुरू करण्यासाठी भाजप नेते दिग्विजय बागल यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात करमाळा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. आचारसंहिता संपल्यानंतर या उपक्रमाच्या अंमलबजावणीला गती देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची संधी
आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरत आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, या उद्देशाने जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीपासून सेमी इंग्रजी शिक्षण सुरू करण्याचा विषय दिग्विजय बागल यांनी पुढे आणला आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरापासून इंग्रजी भाषेचा परिचय होऊन पुढील शिक्षणासाठी त्यांचा पाया मजबूत होण्यास मदत होईल. तसेच जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासोबतच पालकांचा या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन पटसंख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहेया बैठकीला पंचायत समितीच्या सभापती पूजाताई ढेरे, सदस्य भरत अवताडे, नानासाहेब झाकणे, संध्याताई कांबळे, गटशिक्षणाधिकारी रिंकल हाडके तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. यावेळी सेमी इंग्रजी शिक्षण सुरू करण्याच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करून आढावा घेण्यात आला.ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे, जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धेसाठी सक्षम बनविणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. यासाठी दिग्विजय बागल यांनी पुढाकार घेतला असून, आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणीला गती देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.


