स्नेहालय स्कूल मध्ये उत्साही वातावरणात दिंडी साजरी*
करमाळा प्रतिनिधी
ज्ञानेश्वर,तुकाराम,नामदेव इत्यादी संत पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाला आपल्या सहकाऱ्यांसह निघत असत. त्यांच्या हाती ध्वज, पताका इत्यादी असायचे. या मिरवणुकीस दिंडी असे म्हणण्यात येते.त्याच पध्दतीने स्नेहालयच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढली होती.
कालानुरूप याचे स्वरूप बदलले आहे.आता ही दिंडी वारकऱ्यांची निघते. ते आपसात वाटेत येणाऱ्या खर्चासाठी एक ठरावीक रक्कम गोळा करतात व आपल्या गावातून पंढरीस पायी जाण्यास निघतात. या वारीचा उद्देश आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचून विठ्ठलाचे दर्शन घेणे हा असतो.त्यातील बहुतेकांच्या खांद्यावर पताका/ध्वज असतो. कपाळास टिळा, गळ्यात तुळशीची माळ व मुखाने हरिनाम म्हणत वारीतील वारकरी दिंडी सामील होतो.
त्याचप्रमाणे स्नेहालय न्यू ईंग्लिश स्कूल येथे दिंडी उत्साही वातावरणात साजरी झाली.
विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, वारकरी, आदींची वेशभूषा केली होती. संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी व पालक यांनी विठ्ठल रुक्मिणी ची पुजा केली. नंतर ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी राम विठ्ठला’ हे म्हणत पालखी घेऊन दिंडी निघाली.विद्दार्थी विठ्ठल रखुमाई, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, वारकरी, आदी वेशभुषा केली होती हातात भगवे झेंडे,झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचा संदेश स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला होता.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
