Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

मकाई साखर कारखान्याची निवडणुक सभासदाच्या हक्कासाठी लढवणार – प्रा.रामदास झोळ

करमाळा (प्रतिनिधी)
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सभासदांच्या घामाच्या पैशातून उभा राहिलेला मकाई कारखाना दिवाळखोरी कडे चालला असून या कारखान्याला वाचवण्यासाठी बचाव समितीच्या माध्यमातून सर्व गट तट पक्षातील सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मकाईची निवडणूक लढवणार असल्याचे माहिती मकाई बचाव समितीचे निमंत्रक प्राध्यापक रामदास झोळ यांनी दिली
करमाळा विश्राम गृहावर झालेल्या या बैठकीसाठी आदिनाथ कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे आदिनाथचे संचालक डॉक्टर वसंत पुंडे मकाई कारखान्याचे माजी संचालक सुभाष शिंदे आदिनाथकारखान्याचे माजी संचालक प्रमोद बदे
आदिनाथ बचाव समितीचे संचालक प्राचार्य जयप्रकाश बिले आधी जण उपस्थित होते
या मकाई बचाव समितीला किरण कवडे गौरव झांजुर्ण सुजित तात्या बागल शहाजीराव देशमुख सर आदींनी पाठिंबा दिला आहे

बोलताना प्राध्यापक रामदास झोळ म्हणाले की मकाई बचाव समितीला माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पाठिंबा दिला असून मकाईच्या सभासदांच्या हितासाठी व तालुक्याचे हितासाठी जयवंतराव जगताप या निवडणुकीत होणार असल्याची माहिती दिली
याबाबत बोलताना प्राध्यापक रामदास झोळ म्हणाले की मकाई सहकारी साखर कारखाना निष्क्रिय कारभारामुळे रसा तळाला चालला आहे
नोव्हेंबर 2022 पासून आलेल्या उसाचे पहिले पेमेंट सुद्धा कारखान्याने दिलेले नाही पाच ते सात वर्षाचा कर्मचाऱ्यांचा पगार थकीत आहे
मकाई सहकारी साखर कारखाना चांगल्या लोकांच्या ताब्यात दिला तर निश्चितच त्यात बदल घडू शकतो
मकाईच्या सभासदांच्या पुढे आम्ही सक्षम असा पर्याय देणार असून जागृत मतदार मकाई बचाव समितीला निवडून देतील असा आम्हाला विश्वास आहे.करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पुढाऱ्याला रस आहे मात्र मकाईच्या निवडणुकीसाठी प्रत्येक जण राजकीय स्वार्थासाठी आपली भूमिका जाहीर करत नाही
आज सभासदांना सत्ताधाऱ्यांना पायउतार करण्यासाठी नवीन पर्याय हवा आहे तो नवीन पर्याय आम्ही या ठिकाणी देणार असून
निवडणुकीत बागल विरोधक सर्वांना एकत्रित आणून त्यासोबत शेतकरी संघटना सोबत घेणार आहोत.सोमवारी मकाई कारखान्याची अंतिम सभासदाची यादी जाहीर होणार असून येत्या दहा ते बारा दिवसात उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख येईल असा अंदाज आहे प्राध्यापक रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या मकाई बचाव समितीच्या माध्यमातून मकाई कारखान्याची रणधुमाळी सुरू झाली असून मकाई बचाव समिती निवडणूक लढवणार असल्यामुळे येणाऱ्या काळात राजकारणाची दिशा काय ठरेल हे काळच ठरवणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group