श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथील अन्नछत्र पालखी पादुकाचे 25 एप्रिल रोजी करमाळा शहरात फंड गल्ली येथे आगमन
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या स्वामी समर्थ पालखी पादुकाचे आगमन मंगळवार दि 25 रोजी सांयकाळी 6 वाजता करमाळा शहरात फंड गल्ली येथे होणार आहे अशी माहिती स्वामी समर्थ समाजसेवा मंडळानी दिली आहे. सालाबादप्रमाणे स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा करमाळा येथे येणार असुन त्यानिम्मित पालखी पादुका मिरवणुक शहरात काढण्यात येणार आहे त्यानंतर सांयकाळी सात वाजता श्री स्वामी समर्थ आरती पादुका दर्शन त्यानंतर भाविकांना प्रसाद देण्यात येणार आहे तरी करमाळा शहरातील भाविकांनी उपस्थित राहुन पादुका दर्शन प्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ समाजसेवा मंडळ फंड गल्ली यांच्यावतीने करण्यात आले आहे.
