प्रा.महेश निकत सर यांना गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांचे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान
करमाळा प्रतिनिधी
ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा चे संस्थापक अध्यक्ष श्री महेश निकत सर यांना यांना गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांची शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल मानत डॉक्टरेट पदवी पपुणे येथील ग दि माडगूळकर सभागृहात पद्मश्री गिरीश प्रभुणे पिंपरी चिंचवड पुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.यावेळी डॉ. लालबहादूर राणा संस्थापक अध्यक्ष (G.P.F.N) अॅड. डॉ. मंगेश नेने अध्यक्ष, पेण एज्युकेशन सोसायटी, पेणे ,डॉ. महेंद्र देशपांडे राष्ट्रीय अध्यक्ष, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ आंतरराष्ट्रीय राजदूत, गांधी पीस फाऊंडेशन, नेपाळ, डॉ. आशा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष, ग्राहक रक्षक समिती आंतरराष्ट्रीय राजदूत, गांधी पीस फाऊंडेशन, नेपाळ ,डॉ. सुनीलसिंह पुरणसिंह परदेशी भारत प्रभारी, गांधी पिस फाऊंडेशन नेपाळ, संस्थापक अध्यक्ष, कर्तव्यदक्ष फाऊंडेशन प्रमुख उपस्थितीत ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रा.निकत यांचे आजपर्यंत चे शैकणिक कार्याचा आढावा घेऊन त्यांनी आज पर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांनी त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे.
