देवळाली येथे ग्रामदेवत श्री नागनाथ महाराज यांची यात्रा उत्साहात संप्पन
*देवळाली प्रतिनिधी अक्षय तृतीयेच्या मुहर्तावर देवळाली येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांची यात्रा संपन्न झाली यात्रेचे मुख्य आकर्षण पहिला टप्पा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम साडेसहा वाजता संपन्न झाला हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भाविक भक्त उपस्थित होते तसेच गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमानंतर भाविकांनी शेरनी वाटपाचा कार्यक्रम ढोल ताशा डीजे व हलग्याच्या गजरात संपन्न झाला तसेच श्री ग्रामदैवत नागनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मामा शिंदे हे देखील उपस्थित होते व त्यानंतर रात्री अकरा ते सकाळी पाच वाजेपर्यंत छबिण्याचा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला तसेच उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे लोकांची पाणीची गैरसोय होऊ नये म्हणून कै. कल्याण भाऊ गायकवाड यांच्या स्मरणार्थ पाणपोई उभारण्यात आली होती यावेळी कसलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून यात्रा कमिटीचे वतीने तसेच करमाळा पोलीस स्टेशन यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला होता या बंदोबस्तासाठी करमाळा पोलीस स्टेशनची पीएसआय माहुलकर साहेब, ढवळे साहेब व त्यांची टीम उपस्थित होतेे.
