26 नोव्हेंबर संविधान दिन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये सामुदायिक बुद्धवंदना घेऊन साजरा
करमाळा प्रतिनिधी 26 नोव्हेंबर 2024 रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन 74 वा संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदरणीय दशरथ अण्णा कांबळे तसेच श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रमेश अण्णा कांबळे, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले , अर्बन बँकेचे मॅनेजर एस पी कांबळे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता गौतम कांबळे , किसन जानराव , प्रमोद गायकवाड,भीमराव कांबळे सर एल यु कांबळे सर सुनील खरात संतोष कांबळे अनिकेत अडसूळ यावेळी केंद्रीय शिक्षिका उपासक उपासिका यावेळी उपस्थित होते केंद्रीय शिक्षिका शोभाताई कांबळे यांनी संविधानावर मार्गदर्शन केले.हा सर्व कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळा तालुका अध्यक्ष बौद्धाचार्य प्रशांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
