हिंदू संस्कृतीची जपणूक करून देव देश धर्मासाठी काम करणाऱ्या ब्राह्मण समाजाचे कार्य प्रेरणादायी- दिपक चव्हाण
करमाळा प्रतिनिधी हिंदू संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ असून समाजाला दिशा देण्याचे काम ब्राह्मण समाजाने केले असून देव देश धर्म संस्कृतीची जतन करणाऱ्या ब्राह्मण समाजाचे योगदान नक्कीच प्रेरणादायी असून या समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे मत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा यांच्या कार्यालयाचे उद्घघाटनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की करमाळा तालुका अध्यक्ष उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचे सामाजिक कार्य निश्चित आदर्शवत असुन सर्व जातीय लोकांशी असलेले प्रेम जिव्हाळा चे संबंध याचा ऊपयोग ब्राम्हण समाजाच्या विकासासाठी नक्कीच कामाला येणार आहे करमाळा तालुक्यात ब्राह्मण समाजाचे कार्य नक्कीच महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरणार आहे.या कार्यक्रमास कुणबी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी (राजुरी) उपाध्यक्ष श्री रवींद्र विद्वत (वरकुटे) सचिव.बाळासाहेब होसींग. कार्यवाह श्री.निलेश गंधे.(देवाचा माळ) श्री. शंकर कुलकर्णी (कार्याध्यक्ष) करमाळा श्री.सागर कुलकर्णी. सहसचिव ( राजुरी) सचिन कुलकर्णी. प्रसाद विद्वत. गणुकाका कुलकर्णी,शुभम कुलकर्णी, राजेंद्र सुर्यपुजारी,बापु डास,प्रेम परदेशी निखिल बरुटे शुभम झिंजाडे उपस्थित होते.
