करमाळा

महेश मांजरेकर यांचा करमाळा बॅन्ड – बॅन्जो असोसिएशनच्यावतीने निषेध व कारवाईची मागणी

करमाळा प्रतिनिधी वेबसिरीजमध्ये  बॅन्ड वादक कलाकारांना अपशब्द वापरुन अवमान केल्याबद्दल महेश मांजरेकर यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी करमाळा येथील बॅण्ड व बॅन्जो कलावंतांच्या वतीने निषेध करण्यात आला..तसेच महेश मांजरेकर याच्यावर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले. 

मंगलप्रसंगी मानाचे स्थान असणारे बॅण्ड कलावंत पवित्र कला जपणारे लोक असून त्यांच्या कलेविषयी समाजात आदर असताना अशा पद्धतीने महेश मांजरेकर चित्रण करत असतील तर ते निषेधार्ह असल्याच्या भावना कलावंतांनी यावेळी मांडल्या यावेळी इसाक भाई पठाण, नासिर कुरेशी, जाकिर पठाण, जावेद पठाण, पांडुरंग जगताप,युवराज जगताप, मुकतार पठाण, मुलखान पठाण, हमीद पठाण, अलीभाई पठाण, ,प्रफुल्ल दामोदरे,रोफ कुरेशी, तौफिक पठाण,मुन्ना पठाण,राजू शेख,व कलाकार उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group