Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळा

ऊस वाहतुकीमुळे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुका करमाळा च्या वतीने देवीचामाळ-संगोबा रोडवर स्पीड ब्रेकर करण्याचे निवेदन

करमाळा प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुका करमाळा च्या वतीने देवीचामाळ-सांगोबा रोडवर स्पीड ब्रेकर करण्याबाबतचे सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा कार्यालयाला निवदेन देण्यात आले. सध्या ऊस वाहतूक जोरात सूर असल्यामुळे बेजाबदार व नियमबाह्य ट्रॅक्टर चालकावर कसलेच नियंत्रण राहिले नाही त्यामुळे देवीचामाळ-सांगोबा रोडवर वारंवार अपघात/दुर्घटना होत आहे. देवीचामाळ-सांगोबा रोड हा सामान्य नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुका करमाळा च्या वतीने देवीचामाळ-सांगोबा रोडवर स्पीड ब्रेकर करण्याबाबतचे सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा कार्यालयाला निवदेन देण्यात आले. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी च्या विजयमाला चवरे , नलिनी जाधव, राजश्री कांबळे, शीतल क्षीरसागर, लुंगारे हे सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group