भोगेवाडी येथे जिल्हा दूध संघाच्या डेअरीचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते उद्घघाटन
भोगेवाडी प्रतिनिधी
भोगेवाडी येथे जय जवान जय किसान दुध उत्पादक संस्था” या सोलापूर जिल्हा दूध संघाच्या डेअरीचे उद्घाटन सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन रणजितसिऺह (भैय्या) शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना रणजितसिंह (भैय्या) शिंदे म्हणाले कि, बार्शी येथील पशुखाद्य कारखान्याचे दुरुस्तीचे काम पुर्ण झाले आहे. तो पुढील आठवड्यात सुरू करत आहोत. त्यानंतर आपलं चांगले पशुखाद्य तयार होईल.चांगले पशुखाद्य गाई, म्हशींना चारल्यावर दुधाची फॅट व एस. एन. एफ. चांगली लागते व जादा दर मिळतो.जिल्हा दूध संघाचे संकलन १७ हजार वरून आज ते पन्नास हजाराकडे वाटचाल करीत आहे.
ते बोलताना पुढे म्हणाले की, दूध संघाची सर्व संकलन केंद्रे ऑनलाईन केली आहेत. त्याठिकाणी टेस्टिंग मशीन संघातर्फे बसवले आहेत. या सर्वामुळे दूध उत्पादकांना आपल्या दुधाचे फॅट, एस. एन. एफ. व दुधाच्या किमतीचा मेसेज मोबाईलवर जात आहे. त्यामुळे दुधाची गुणवत्ता चांगली होत असून भेसळ प्रमाण कमी होत आहे.पशुधनाचे संगोपन कसे करायचे, पशुखाद्य कशा प्रकारे खावू घालावे यासर्वासाठी शिबिराचे आयोजन केले जाईल. डेअरी ही एकाची नसावी,ती सर्वांनी मिळून चालवावी. परिसरातील सर्व गावकऱ्यांनी जिल्हा दूध संघाचे संकलन वाढण्यासाठी “गाव तिथे डेअरी ” सुरू करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी सरपंच विश्वंभर पठाडे, सरपंच प्रतिनिधी संतोष गायकवाड सर, उपसरपंच संतोष काळे, सोसायटीचे चेअरमन सुनिल काळे,माजी सरपंच रावसाहेब कौले, रामकृष्ण गायकवाड, बबन काळे, लक्ष्मण शेळके, गणेश काळे, संकलन अधिकारी शिवाजी जाधव, महाडिक साहेब इ. मान्यवर व दुध उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
