करमाळाराजकीय

करमाळा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीवर आ. संजयमामा शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व… 5 ग्रामपंचायती स्वबळावर तर 10 ठिकाणी युतीसह विजय …

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज हाती आला असून त्यामध्ये यापूर्वीच 3 ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या. या 3 ग्रामपंचायतीपैकी लिंबेवाडी आणि अंजनडोह या 2 ग्रामपंचायती आमदार संजयमामा शिंदे गटाच्या बिनविरोध निवडून आलेले होत्या. तसेच निवडणूक लागलेल्या 27 ग्रामपंचायती पैकी 2 ठिकाणी सदस्य बिनविरोध निवडले होते .त्या ठिकाणी फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागली होती. यामध्ये टाकळी व पोफळज येथे आमदार संजयमामा शिंदे गटाचे सर्वच सदस्य बिनविरोध निवडून आले होते. फक्त त्या ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक लागली होती पोफळज येथे कल्याण निवृत्ती पवार व टाकळी येथे सौ रंजनाताई दोडमिसे या विक्रमी मताने जनतेतून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत.
तसेच तालुक्याचे लक्ष वेधलेल्या वाशिंबे ग्रामपंचायत च्या सरपंच पदी ही आमदार संजय मामा शिंदे गटाचे तानाजी बापू झोळ हे 270 मताधिक्य घेऊन विजय झालेले आहेत . खडकी येथे सौ चंद्रकला उमाकांत बरडे, कुंभारगाव सौ सुनीता रामदास पोळ, पारेवाडी सौ वंदना हनुमंत नवले, कात्रज सौ सुनीता मनोहर हंडाळ, पोमलवाडी श्री नवनाथ मल्हारी गायकवाड ,कोंढार चिंचोली शरद नाथसाहेब भोसले, देलवडी सौ रेखा ढवळे, तरडगाव सौ रजनी जगदाळे, सोगाव श्री विनोद सरडे, कामोने श्री रमेश खरात यांची लोकनियुक्त सरपंच पदी निवड झालेली असून उर्वरित ग्रामपंचायत मध्ये सरपंच पद जरी शिंदे गटाला मिळालेले नसले तरी वरकटने , जींती, हिंगणी या ग्रामपंचायत मध्ये सदस्य शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत .
या सर्व निवडून आलेल्या सदस्यांचा सन्मान आमदार संजय मामा शिंदे संपर्क कार्यालय करमाळा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत काका सरडे, पंचायत समितीचे माजी सदस्य विलास दादा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रहास बापू निमगिरे, कोर्टी चे माजी सरपंच सुभाष अभंग, मांगीचे ग्रामपंचायत सदस्य सुजित तात्या बागल यांच्या हस्ते करण्यात आला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group