पालकमंत्री ना .जयकुमार गोरे यांनी घेतली माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट
*
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री मा ना श्री जयकुमार गोरे साहेब यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली . माजी आमदार जगताप यांनी भाजप -राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला समर्थन देण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल पालकमंत्री ना .गोरे यांनी यावेळी आभार मानले . या वेळी माजी खासदार रणजीतसिंह नाईक – निंबाळकर, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मीदीदी बागल, विलासराव घुमरे सर, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शंभूराजे जगताप,दिनेश भांडवलकर आदी उपस्थित होते .


