एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पुन्हा व्हावेत करमाळ्याच्या लाडक्या बहिणींची मागणी
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्रचंड बहुमताने विक्रमी 240 जागा करमाळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या 51 लाडक्या बहिणींचा सत्कार शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.यावेळी प्रत्येक महिलेने आपल्या मनोगत व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा अशी मागणी केली . प्रभू श्रीरामाच्या मंदिरातमुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचा सत्काराचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने आज घेण्यात आला.जे अभूतपूर्व यश मिळाले आहे ते लाडक्या बहिणींनी दिलेल्या मतदानामुळे मिळाली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे ,तालुकाप्रमुख राहुल कानगुडे,शहर प्रमुख संजय शीलवंत ,जेऊर शहर प्रमुख माधव सूर्यवंशी ,उपशहर प्रमुख निलेश चव्हाण,जेऊर शाखाप्रमुख संजय जगताप,पांडुरंग जाधव गणेश आल्हाट ,हनुमंत गुळवे,दीपक औतारी, आरएसएस चे राधेश्याम देवी,विजयकुमार देशपांडे,बबलू कुलकर्णी ,भैय्या चिवटे शिवकुमार चिवटे,सुनील वायक,रपिंटू गायकवाड,चंद्रकांत कारंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते .शहर प्रमुख महिला आघाडी कीर्ती स्वामी यांनी उपस्थितांचे स्वागत केले
51 महिलांना भगवी शाल व श्रीरामाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
@@@@
शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की
येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या निवडणुका आहेत या निवडणुका जिंकायच्या असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असणे गरजेचे आहे.निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे करून लढवल्या आहेत
एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या मनातला हृदयातला ताईत झाले आहेत
एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित करावे महेश चिवटे यांनी व्यक्त केले आहे.
