दत्तकला शिक्षण संस्थेत आषाढी एकादशी निमित्त “आनंदवारी” सोहळा आनंदात साजरा
करमाळा प्रतिनिधी
दत्तकला इंटरनॅशनल स्कूल S.S.C. आणि C.B.S.E. विभाग यांच्या संयुक्त विदयमाने “आनंदवारी” सोहळा १६ जुलै रोजी अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला.
या निमत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये संतांच्या वेशभूषा, वारकरी फुगडी, नृत्य, अभंग गायन, भारुड,लेझिम, असे कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले.
या प्रसंगी बोलताना संस्थेच्या सचिव आदरणीय माया मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वारीचे महत्त्व सांगितले,आणि वारीमध्ये मिळणारी संघभावना,बंधुता, समता, प्रेम, भक्तिभाव,या मूल्यांचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय झोळ सर यांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी,दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रामदास झोळ सर, संस्थेचे उपाध्यक्ष मा.राणादादा सुर्यवंशी साहेब, सचिव मा. सौ. माया झोळ मॅडम ,तसेच आजचे विशेष अतिथी आपणा सर्वांचे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आदरणीय श्री. मधुकरकाका झोळ , संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. विशाल बाबर सर, डायरेक्टर ऑफ स्कूल सौ. ताटे मॅडम, जूनियर कॉलेजच्या प्राचार्या सौ यादव मॅडम , सर्व विभागाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
