मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे प्रा. रामदास झोळ सर यांनी घेतली भेट.*
करमाळा प्रतिनिधी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे प्रा.रामदास झोळ सर यांनी भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणींविषयी मनोज दादा जरांगे पाटील आणि झोळ सर यांच्यामध्ये मुद्देसूद चर्चा झाली. यामध्ये आत्ता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणी तसेच एस बी सी, एस ई बी सी ,ओबीसी, एनटी समाजाच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी विषयी सरांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सखोल चर्चा केली.
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेचा आणि महत्त्वाचा असल्याने येत्या काळामध्ये शैक्षणिक दृष्ट्या सरकारकडे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींविषयी सरकारकडे कोणत्या प्रकारची मागणी असायला हवी तसेच समाजाच्या काय अडचणी आहेत हे मनोज दादा जरांगे पाटील आणि झोळ सरांच्या मध्ये झालेल्या चर्चेचे प्रमुख मुद्दे होते.
यामध्ये
१) बहुजन समाज कल्याण विभागाने दि.१४ जून २०२४ रोजी १५५४ अभ्यासक्रमांना अनुसूचित जातीप्रमाणे OBC ,NT(A,B,C,D),SBC यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे परंतु SEBC,OPEN EWS चे विद्यार्थी यातून वगळले आहेत तरी या SEBC,OPEN EWS विद्यार्थ्यांना १५५४ च्या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती मिळावी. अशी मागणी शासनाकडे करण्याची विनंती सरांनी केली.
२) SEBC, OBC व इतर सर्वच जातींना जात पडताळणी प्रमाणपत्र प्रवेशावेळी सादर करावे लागते हे प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिने वाढवण्यात यावी.
३) १०० % फी माफी ही सरसकट सर्व मुलींना देण्यात यावी सध्याच्या शासन निर्णया नुसार OPEN प्रवर्गातील मुलींना वगळण्यात आले आहे. यामध्ये OPEN प्रवर्गातील मुलींचा देखील समावेश करण्याची मागणी जरांगे पाटील यांच्याकडे करण्यात आली.
४) ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सरसकट वस्तीगृह भत्ता देण्यात यावा सध्या प्रत्येक जिल्ह्यासाठी ६००विद्यार्थ्यांना भत्ता देण्याची तरतूद शासनाच्या पत्रकात आहे.हा नियम बदलून OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ.पंजाबराब देशमुख वसतिगृह भत्ता प्रमाणे सरसकट भत्ता देण्यात यावा.यामुळे आता कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
