करमाळा

शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम दिले जाईल त्यांच्या कल्याणासाठी आपण सदैव खंबीरपणे पाठीशी उभा राहणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे आदर्श शिक्षक उत्तम हानपुडे  राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित                       करमाळा प्रतिनिधी शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम दिले जाईल त्यांच्या कल्याणासाठी आपण सदैव पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफच्या पहिल्या अधिवेशनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. पालघर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक आघाडीचे पहिले अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन झाले.शिक्षकांनी फक्त शिकवण्याचे काम करण्याचा निर्धार अधिवेशनात व्यक्त करण्यात आला . माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष करमाळा तालुक्यातील आदर्श शिक्षक म्हणून धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे येथे कार्यरत असलेले उत्तम हानपुडे यांना महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडी यांच्या पालघर येथील राज्य अधिवेशनामध्ये शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.26 एप्रिल टी.डीएफ महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडीच्यावतीने हे अधिवेशन स.तु.कदम माध्यमिक विद्यालय पालघर येथे संपन्न झाले. राज्य अध्यक्ष जी के थोरात सर स्वागत अध्यक्ष नरसू पाटील सर कार्यवाहक पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर व राज्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास एबीपी माझाचे संपादक प्रवक्ते प्रसन्ना जोशी पालघरचे आमदार राजेंद्र गावीत ,आमदार निरंजन डावखरे ,आमदार राजेंद्र पाटील यांच्या उपस्थित होते .यावेळी प्रसन्ना जोशींनी शिक्षकांच्या व्यथा मांडल्या. जीवन गौरव पुरस्कार राज्यातील गुणवंत शिक्षकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मंत्री उदय सामंत यांची उपस्थित होती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शिक्षकांना फक्त शिकवण्याचेच काम दिले जाईल शिक्षकांच्या सर्व मागण्याचा विचार करून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!