करमाळा

आमदारांनी करमाळा तालुक्याची आमसभा घ्यावी :- संजय (बापु) घोलप

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील आमसभा आमदार मा.नारायण (आबा) पाटील यांनी घ्यावी अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष मा संजय (बापु) घोलप यांनी केली आहे
करमाळा तालुक्यात गेले 15 वर्षापासुन आमसभा झालेली नाही गेली पाच वर्षा पासुन आमसभा घ्यावी अशी मागणी मनसेच्या माध्यामातून पत्राद्वारे सोशल मिडीया पत्रकार यांच्या वृत्तपत्रातून केली जात आहे.करमाळा तालुक्यातील व शहरातील सर्वसामान्य शेतकरी व्यापारी विद्यार्थी व नागरिकांच्या प्रश्नाना वाचा फोडून त्यांचे काम अनेक शासकीय कार्यालयात आधिकारी वर्गाकडे रखडलेले असुन त्याला कोणी वाली राहिला नसुन आमसभेच्या माध्यामातून सर्वसामान्य नागरिकांना आमदार मा.नारायण (आबा) पाटील यांनी आमसभा घेऊन नागरिकांच्या मनातील प्रश्नाना व रखलेले कामांना वाट मोकळी करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा च्या वतीने करत आहोत..
सर्वसामान्य नागरिकांना अधिकारांना आपल्या कामाचा जाब विचारण्याची संधी म्हणजे आमसभा हि प्रत्येक वर्षी झाली पाहीजे होती पण दुर्दैव गेली 15 वर्षापासुन करमाळा तालुक्यात आमसभा झालीच नाही ..तरी नागरिकांकडून आमदार मा.नारायण (आबा) पाटील तरी आमसभा घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली  आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!