मकाई साखर कारखान्यासाठी बागल गटाचे कट्टर समर्थक उंदरगावचे उपसरपंच रेवणनाथ निकत यांना उमेदवारी देण्याची मागणी
उंदरगाव प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पारेवाडी भागातून बागल गटाच्या वतीने उंदरगावचे उपसरपंच रेवणनाथ निकत यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी उंदरगाव बागल प्रेमी ग्रामस्थांनी केली आहे. रेवननाथ निकत हे बागल गटाचे कट्टर समर्थक असून उंदर गावचे उपसरपंच म्हणून काम करत आहे. मागील दोन टर्मला मांजरगाव सोगावच्या उमेदवाराला संचालकाची उमेदवारी देण्यात आली संचालक पद देण्यात आले अशा परिस्थितीतही गटाचे हित पाहून बागल गटाचे काम नाराज न होता तन मन धनाने करून गट वाढवण्याचे काम रेवननाथ निकत यांनी केले आहे. बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, मार्गदर्शक विलासराव घुमरे सर व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करणार असल्याचे रेवणनाथ निकत यांनी सांगितले आपल्या निष्ठेला बागल गट नक्कीच न्याय देईल व मकाई साखर कारखान्याची उमेदवारी देऊन संचालक पदी काम करण्याची संधी मिळेल असा विश्वास रेवणनाथ निकत व बागलप्रेमी उंदरगाव ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.


