Wednesday, April 29, 2026
Latest:
Uncategorized

धवल इंदुरे याची शालेय स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरावर कामगिरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा-शहरातील भवानी पेठ येथील धवल केतन इंदुरे याने विविध ४शालेय स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरावर रँक मिळवत यश संपादन केले आहे.शालेय विद्यार्थ्यांना लोकसेवा आणि राज्यसेवा परीक्षांचा प्राथमिक अनुभव आणि सराव व्हावा या हेतुने राज्यातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्था अशा स्पर्धा परीक्षा दरवर्षी घेत असतात.या परीक्षेसाठी राज्यभरातुन लाखो विद्यार्थी बसतात.या परीक्षेत सामान्य ज्ञान..बुध्दिमता..गणित..इंग्रजी-मराठी व्याकरन आदि स्वरूपातील प्रश्नावली असते.चि.धवल याने IAS..मंथन..लक्षवेध..”विनर ऑफ द इयर” या परीक्षेत राज्यस्तरावर २-३-४-७ अशी रँक मिळवत यश मिळवले.तर अशाच स्वरूपातील इतर ३ स्पर्धेत जिल्हा व तालुका स्तरावरील गुणवत्ता यादित स्थान मिळवले आहे.या कामगिरी बद्दल त्याचा पुणे..सातारा..अहिल्यानगर या ठिकाणी सन्मान सोहळा पार पडला.बारामती येथे जय पवार यांनी विशेष कौतुक करीत शाबासकी दिली.चि.धवल हा गुरूकुल पब्लिक स्कुल चा इ.२री चा विद्यार्थी आहे.त्याला वर्गशिक्षिका सौ.श्वेता ओव्हाळ यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल गुरूकुल चे संस्थापक प्राचार्य श्री.नितीन भोगे व सौ.रेश्मा भोगे यांनी अभिनंदन केले.तर भवानी पेठ येथे नगरसेवक श्री.सचिन गायकवाड..सुनिल बनसुडे..तुकाराम इंदलकर यांनीहि सन्मान करून शुभेच्छा दिल्या.

error: Don\'t try to copy. Content is protected !!