करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय करमाळा यांच्या वतीने पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलिसांसाठी दिनांक १३ ॲागस्ट रोजी आरोग्य शिबिर संपन्न
करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणे मध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांची रक्त तपासणी शिबिर घेण्यात आलेले आहे.पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना 24 तास जनतेची सेवा करावी लागते.सदर कर्तव्य करीत असताना पोलिसांना वेळेवर जेवण .पाणी… झोप… आराम मिळत नाही…. तसेच रात्रंदिवस कर्तव्य बजावत असताना त्यांचे स्वतःचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते.त्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडत असते
.त्यामुळे पोलिसांना नेहमीच बीपी शुगर व इतर असे विविध आजार उद्भवत असतात.
स्वतःच्या आरोग्याकडे त्यांना लक्ष देता येत नसते…
त्यामुळे पोलिसांचे आरोग्य सुरक्षित रहावे.त्यांचे आरोग्य सुरक्षित राहिल…त्यांना व्यवस्थित कर्तव्य बजावते येईल याकरिता करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय करमाळा यांचे मार्फत पोलिसांसाठी दिनांक १३/८/२०२५ रोजी आरोग्य शिबिर घेण्यात आलेले आहे..त्यामध्ये सर्व पोलिसांची रक्ताची तपासणी करून खालील वेगवेगळ्या रक्त तपासणी करण्यात आलेले आहेत….
1.. सीबीसी …2.. एल एफ टी / केएफटी ..3… एच बी ए वन सी…
4…एच आय व्ही..5… व्हि डी आर एल. 6… टी एफ टी..
सदरचे आरोग्य शिबिर हे माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर… अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर.. माननीय SDPO मॅडम अंजना कृष्णा यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेले आहे .सदर आरोग्य शिबिरासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे एम एस डॉक्टर गजानन गुंजकर… प्रमोद खोबरे वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ…. कपिल भालेराव समुपदेशक… ज्ञानेश्वरी पाटील प्रयोगशाळा तंत्रज्ञ… अनिता जगताप एल डब्ल्यू एस लिंक वर्कर… यांनी मदत केलेली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षकरणजीत माने. दिली आहे.


