करमाळा नगपरिषदेच्या वतीने माझे कुंटूब माझी जबाबदारी मोहिम अंतर्गत निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी. . महाराष्ट्र शासनाकडून कोवीड – 19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न म्हणून माझे कुंटूंब माझी जबाबदारी मोहिमेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात सुरु आहे.या मोहिमे अंतर्गत नगरपरिषदेकडून शहरांमध्ये प्रत्येक कुंटूबाचे आरोग्य तपासणी सुरु आहे. कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर, या पलीकेडे जावून वैयक्तीक,कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलाचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. अशा बदलांचा स्वीकार करुन नवीन जीवन शैली पध्दतीचा अवलंब करण्यास अधिकअधिक व्यक्तींना प्रेरित करुन प्रभावी आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी मा.वैभवराजे जगातप, नगराध्यक्ष करमाळा नगरपरिषद यांचे प्रेरणेतून व मार्गदर्शनानुसार नगरपरिषदेकडून कोरोना विरुध्द जनजागृतीपर निबंध व व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दि.30/09/2020 रोजी केले आहे.
सदर स्पर्धेचा विषय 1)कोरोनावर मात करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी, 2)कोरोना प्रतिबःध उपाय कोरोना झाल्यावर घेयची काळजी व कोरोना होऊन गैल्यावर घ्यायची कावजी, 3) मला समजलेला व मी आनुभवलेला कोरोना असा आहे. सदर वक्तृत्व व निंबध स्पर्धा नागरिक, शिक्षक, डॉक्टर या तीन गटांसाठी असून प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढण्यात येईल. सदर निबंध स्पर्धेसाठी शब्दमर्यादा जास्तीत जास्त अडीशे शब्द राहील. वक्तृत्व स्पर्धेसाठी कालमर्यादा दहा मिनिट असेल. या करिता प्रथम क्रमांक 1000/- रु.बक्षिस,व्दितीय क्रमांक 700/- रु.बक्षिस, तृतीय क्रमांक 500/- रु. बक्षिस असे प्रत्येक स्पर्धेसाठी असेल. तरी सदर स्पर्धे मध्ये नागरिक, शिक्षक, डॉक्टर यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कोरोना विरुध्दच्या जनजागृती लढ्यामध्ये योगदान द्यावे.
सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 1) श्रीमती स्वाती जाधव,मो.नं.7387908395, 2) कु.आश्विनी पाटील,मो.नं.7387908395, 3) श्री.तुषार टांकसाळे, मो.नं.9960236571, 4) श्री.गणेश शिंदे, मो.नं.83083630945 यांना संपर्क साधून दि.29/09/2020 पर्यंत नाव नोंदणी करुन घ्यावी. आयोजन केलेल्या स्पर्धेचे परिक्षण दि.30/09/2020 रोजी सकाळी 11.00 वाजता होईल याची नोंद घ्यावी.
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव रोखण्यासाठी न.पा.च्या वतीने जनजागृतीकरिता आयोजित केलेल्या निबंध, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धा यशस्वी करणेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
– वैभवराजे जगताप,नगराध्यक्ष,करमाळा नगरपरिषद,करमाळा.