Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडी

अनाथांचा नाथ असलेले शिवसेना नेते मा ना श्री एकनाथजी शिंदे यांच्यासाठी करमाळा येथील शिवसैनिकांचे ग्रामदैवत आई कमलाभवानीला साकडे

करमाळा प्रतिनिधी शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच कोरोनामुक्त होण्यासाठी साकडे घालत करमाळा तील शिवसैनिकांनी श्री कमलाभवानी देवीला महाआरती केली.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शहर प्रमुख प्रवीण कटारिया, महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रियंकाताई गायकवाड उपशहर प्रमुख पंकज परदेशी संजय भालेराव युवा सेना तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे अध्यक्ष सुखदेव लष्कर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी करमाळ्याचे जागृत देवस्थान असलेल्या कमलाभवानी देवी ला शिवसैनिकांनी महाआरती केली शिवसेना नेते एकनाथ शिंदे कोरूना बाधित झाले असून सध्या त्यांच्यावर ठाण्यातील एका हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.गेल्या सहा महिन्याच्या काळात एकनाथ शिंदे यांनी तळागाळात जाऊन सर्वसामान्य लोकांना मदत केली होती कोरोना रोगाची भीती न बाळगता कोरोना बाधित रुग्णांना थेट कोविंड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांचीची पाहणी करून त्यांना उपचार कसे वेळेवर होईल याची दक्षता घेतली होती.सांगली- कोल्हापूर येथे आलेल्या महापुरात सुद्धा एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाच दिवस तेथे थांबून पुरग्रस्तांना मदत केली होती अशा सर्वसामान्यांना मदत करणाऱ्या लाखाचा पोशिंदा असणाऱ्या एकनाथ शिंदे साहेब कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे शिवसैनिक चिंताग्रस्त झाले आहेत. नामदार एकनाथ शिंदे साहेब लवकर बरे होऊन पुन्हा त्यांना सर्वसामान्यांची सेवा करण्याची ताकत आई कमलाभवानीने द्यावी असे साकडे देवीला घालून शिवसैनिकांनी महाआरती केली.त्याच प्रमाणे संगोबा येथील आदिनाथ महाराज या मंदिरात सुद्धा अभिषेक करून आदिनाथ महाराजांना साकडे घालण्यात आले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group