Saturday, September 19, 2026
Latest:
करमाळाताज्या घडामोडी

करमाळा शहर व तालुक्यात २९ सप्टेंबर रोजी १७ कोरोना पाॅझिटिव्ह

करमाळा प्रतिनिधी .                                   करमाळा शहर व तालुक्यात २९ सप्टेंबर रोजी एकूण १३५ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये १७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. असून यात ११ पुरुष तर ६ महिलांचा समावेश आहे.  करमाळा शहरात ५० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. यामध्ये  वेताळ पेठ – १ महिला, खाटीक गल्ली – २ पुरुष, दत्तपेठ – १ महिला  तर ग्रामीण भागात ८५ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये १३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये    गुळसडी – १ पुरुष, १ महिला, करंजे – २ पुरुष, ३ महिला, साडे – १ पुरुष, आदिनाथ कारखाना – १ पुरुष, जेऊर – १ पुरुष, कोंढारचिंचोली – १ पुरुष, वांगी – १ पुरुष, सरपडोह – १ महिला आज ४६ जणांना उपचार करून घरी सोडले असून आजपर्यंत १५८४ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच सध्या २९४ जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत तालुक्यात एकूण २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे 

error: Don\'t try to copy. Content is protected !!