ह.भ.प.रामदास महाराज कैकाडी यांच्या रूपाने परिवर्तनवादी चळवळीचा कर्ता मार्गदर्शक हरपला-नागेशजी कांबळे*

करमाळा प्रतिनिधी. परिवर्तनवादी चळवळीत ह.भ.प.रामदास महाराज यांचे कार्य खूप मोठे आहे.करमाळ्यातील आंबेडकरी चळवळी ने नेहमीच परिवर्तन वादी चळवळीत योगदान दिले आहे त्यामुळेच ह.भ.प रामदास महाराज यांच्याशी आमचा संबंध आला व चळवळीत काम करण्याची संधी मिळाली परंतु अचानक रामदास महाराज यांचे निधन झाले व चळवळीची फार मोठी हानी झाली आहे असे मत रिपाई(आ) चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेशजी कांबळे यांनी केले. येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर पूतळ्यासमोर ह.भ.प.रामदास महाराज कैकाडी यांना आदरांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ,दलित सेनेचे लक्ष्मण भोसले,यशपाल कांबळे,प्रफुल्ल दामोदरे,प्रा नितिन कांबळे सर,नितिन दामोदरे,भिमराव कांबळे,प्रसेनजित कांबळे,कालीदास पवार.बाळू कांबळे.मयूर कांबळे.केतन कांबळे.राम कांबळे.इ उपस्थित होते
