आदिनाथ साखर कारखान्याला वाचवायचे असेल तर सर्वसामान्य सभासंदाचे मुलांना संचालक बनवा तेच कारखाना वाचवतील.-ॲड अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सह. साखर कारखान्यावर सध्या प्रशासक असुन, तालुक्यातील महेश चिवटे व संजय गुटाळ हे तज्ञ संचालक म्हणुन आहेत, त्यातच आणखी पाच लोकांना सल्लागार म्हणुन नेमण्यात आले होते परंतु त्यापैकी सुहास गलांडे आणि धुळाभाऊ कोकरे यांना वगळता अच्युत पाटील, डॉ. पुंडे आणि हरिदास डांगे साहेब या तिघांनी सल्लागार पद नाकारले आहे. याबाबत पश्चिम भागातील युवक नेते आणि राजकीय विश्लेषक, अभ्यासक असणारे ॲड. अजित विघ्ने यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी आदिनाथ साखर कारखाना खरचं वाचविण्याची गरज असेल तर सर्वसामान्य शेतकर्यांच्या मुलांना आता संचालकत्व द्यावे लागेल तरच कारखाना वाचेल असे स्पष्ट केले तसेच जुन्या संचालक, चेअरमन यांनी आता याबाबत अजिबात लक्ष घालु नये. तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांनी आदिनाथ पासुन अलिप्त राहुनच सर्वसामान्याच्या होतकरू तरुणांना संधी देऊन संचालक म्हणुन पाठवले पाहीजे. आदिनाथ हे शेतकऱ्यांचे मंदीर आहे असे म्हणणाऱ्या पासुन तर आता खुपच भीती वाटायला लागली आहे. मंदीराचे पुजारी होऊन कारखान्याची वाट लावणारांना जनता धडा शिकविणार आहेच. वस्तुतः मधल्या काळात हा कारखाना भाडे तत्वावर बारामती ॲॅग्रो ला दिला असता तर नक्कीच आज चांगले दिवस बघायला मिळाले असते परंतु त्यावेळी गलिच्छ राजकारण झाले असुन, ही संस्था मातीत घालणारांनी या संस्थेच्या हिताचा थोडा तरी विचार करून जुन्या सर्व संचालक व माजी चेअरमन ,व्हा.चेअरमन यांनी नव्यांना संधी द्यावी. आजपर्यत या संस्थेत सर्वांनाच संधी दिली परंतु सब घोडे बारा टक्के ही म्हण खरी ठरत कोणीच संस्थेला गर्तेतुन बाहेर काढले नाही. त्यामुळे आता सर्वसामान्य शेतकरी व ऊस उत्पादकांची तरुण मुलेच संधी दिल्यास हा कारखाना वाचवतील. असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.
