करमाळा

करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील 13 गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने कुर्डू येथील बेंद ओढयाचे अर्धवट काम पुर्ण करण्याच्या मागणीस पाठिंबा -प्रा.रामदास झोळसर

करमाळा प्रतिनिधी करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील छत्तीस गावांमधील कुर्डु येथील बेंद ओढ्याचे अर्धवट काम लवकरात लवकर पुर्ण करण्यासात यावे या मागणीसाठी कुर्डू व परिसरातील नागरिक नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाठिकाणी उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणास आपला पाठिंबा समर्थन असल्याचे मत प्राध्यापक रामदास झोळसर यांनी व्यक्त केले आहे.नागपूर येथे हिवाळी अधिवेशन उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते कुर्डु व परिसरातील श्री अण्णासाहेब ढाणे बाबाराजे जगताप ,संदीप पाटील संतोष जगताप ,सुधीर लोंढे , ज्ञानदेव चोपडे ऋषिकेश मुंगसे यांची भेट घेऊन त्यांची बाजू व प्रश्न समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कुर्डु व परिसरातील तेरा गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. तसेच दरवर्षी शासनाचा पाण्याचा उपयोग करण्यासाठी व चारा छावणीसाठीचा जो खर्च होत आहे. तोही कमी येणार आहे.यामुळे बेंदऒढ्याचे काम पुर्ण करण्याबरोबर त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत. यामध्ये सीना माढा सिंचन योजनेचे कुर्डू ते शिराळ दरम्यान राहिलेले अर्धवट काम पूर्ण करावे भीमा सिना जोड कालव्यातून बेंद वाड्यात पाणी सोडावे अथवा सिना माढा सिंचन योजनेची पाईपलाईन शिडशिंगे यांनी या दोन्ही पर्यायातून कुर्डु व परिसरातील तेरा गावाचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या संदर्भात आंदोलनकर्त्यांची रास्त मागणी असून या मागणीचा विचार न झाल्यास मुंबई मंत्रालयावर आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा असून आपण याकामी चर्चा विचार विनिमय करून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळसर सर यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group