करमाळा

वार्ड क्रमांक चारमध्ये विकासकामांना गती- सौ.स्वातीताई महादेव फंड यांच्या प्रयत्नांना यश

करमाळा (प्रतिनिधी) —मा. नगरसेविका स सै.स्वातीताई महादेव फंड यांच्या पुढाकाराने व मा.आमदार संजय मामा शिंदे यांच्या सहकार्यातून कन्हैयालाल देवी यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्रमांक चारमध्ये विविध विकासकामांना गती मिळाली आहे.
कृष्णाजी नगर परिसरातील अण्णासाहेब हायस्कूल ते धनवे घरा पर्यंत रस्त्याचे काम विविध योजनेतून एक कोटी रुपयांचे काम सुरू झाले असून, आयसीआयसीआय बँक ते आमृळे दुकान तें फंड गल्लीपर्यंत एक कोटी पंचवीस लाख रुपयांच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामांमुळे परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीच्या अडचणी दूर होणार आहेत.नगरसेविका सौ. स्वातीताई महादेव फंड यांनी सांगितले की, “या विकासकामांसाठी मा. आमदार संजय मामा शिंदे यांच्या सहकार्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेतला आहे. तसेच वार्डातील पाणीपुरवठा समस्येचे निराकरण करण्यासाठीही प्रयत्न सुरू असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.”याशिवाय वार्डातील विविध मूलभूत सुविधा आणि सौंदर्यीकरणाच्या कामांना देखील गती देण्यात येत असून, नागरिकांच्या सुविधा आणि विकास हा आमचा प्रमुख उद्देश असल्याचे सै.स्वाती महादेव फंड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
या कामांमुळे वार्ड क्रमांक चारमधील रहिवाशांना दिलासा मिळणार असून नागरिकांनी नगरसेविकांच्या या कार्याचे स्वागत केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!