जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. गणेश भाऊ चिवटे यांच्या हस्ते वाशिंबे परिसरातील विविध विकासकामांचे भव्य भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
*
वाशिंबे प्रतिनिधी – भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. गणेश भाऊ चिवटे यांच्या हस्ते वाशिंबे परिसरातील विविध विकासकामांचे भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा रविवार, दि. ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्यात ग्रामपंचायत वाशिंबे अंतर्गत एकूण सुमारे ३९ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले असून, या सर्व कामांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.कामांची माहिती पुढीलप्रमाणे —
१️⃣ भैरवनाथ मंदिर ऑल कंपाऊंड व पेव्हर ब्लॉक बसवणे — ७ लाख रुपये (कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८:३० वा.)
२️⃣ दलित वस्ती गावठाण गार्डन पेव्हर ब्लॉक बसवणे — ७ लाख रुपये
३️⃣ दलित वस्ती गायकवाड वस्ती येथे स्ट्रीट लाईट दिवे बसवणे — ७ लाख रुपये
४️⃣ सोगाव-वाशिंबे शिवरस्ता मुरुमीकरण करणे — ३ लाख रुपये
५️⃣ समशानभूमी दुरुस्ती व पेव्हर ब्लॉक बसवणे — ५ लाख रुपये
६️⃣ पवार वस्ती येथे भगीरथ डीपी बसविणे — १० लाख रुपये
या सर्व विकासकामांमुळे वाशिंबे गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असून, ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनातही सोय व सुविधा वाढतील.
कार्यक्रमाचे आयोजन सरपंच तानाजीबापू झोळ, मा.उपसरपंच अमोल पवार यांनी केले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव,भाजपा तालुका अध्यक्ष काकासाहेब सरडे , मा.सरपंच प्रताप झोळ उपस्थित होतेया प्रसंगी मा. गणेशभाऊ चिवटे गावातील नागरिकांशी संवाद साधून पुढील काळातील विकास कामासंदर्भात चर्चा केली. व पुढील काळात पालकमंत्री जयकुमार गोरे मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , मा.आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिंबे गावाला विकास निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली.या वेळी ग्रामपंचायत सदस्य,गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


