श्री कमलाभवानी मंदिरात पौर्णिमेनिमित्त 1 ऑगस्ट रोजी ह भ प सखुबाई शिंदे कामाणेकर यांचे सुश्राव्य किर्तन
करमाळा प्रतिनिधी करमाळ्याची कुलस्वामिनी श्री कमला भवानी मातेच्या मंदिरामध्ये पौर्णिमेनिमित्त श्री कमलादेवी छबिना मिरवणूक रात्री नऊ वाजता निघणार आहे तसेच सायंकाळी ह भ प सखुबाई शिंदे महाराज कामोणेकर यांचे अतिशय सुश्राव्य अशी कीर्तन श्रीदेवीचा माळ येथे दिनांक1 मंगळवार 2023 रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या कालावधीत होणार आहे . श्री कमलादेवी मंदिरामध्ये सदर कीर्तन होणार असून सदर किर्तन श्रवणाचा लाभ शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन जगंदबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे सचिव अनिल पाटील विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील डॉक्टर श्री महेंद्र नगरे श्री सुशील राठोड यांनी केले आहे. कार्यक्रम प्रशासन अधिकारी महादेव भोसले व्यवस्थापक अशोक गाठे हे परिश्रम घेत आहे. संयोजक श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ श्रीदेवीचामाळ प्रवर्तक ह भ प बाबासाहेब साबळे महाराज यांनी आहे.
