जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धैत महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील विद्यार्थी जयराज दळवे विजयी
करमाळा प्रतिनिधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा कुमठा नाका जिल्हा क्रीडा संकुल याठिकाणी 25/112022 वार शुक्रवारी पार पडल्या त्याठिकाणी इयत्ता: 6 वी क मध्ये शिकत असलेला विद्यार्थी जयराज दळवे हा जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धैत विजयी झाला. त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थेचे चेअरमन मा. आमदार श्री जयवंतराव जगताप साहेब, संस्थेचे विश्वस्त मा. नगराध्यक्ष श्री वैभवराजे जगताप साहेब, संस्थेचे विश्वस्त किंग ग्रुप चे संस्थापक श्री शंभूराजे जगताप तसेच संस्थेचे मुख्याध्यापक श्री कापले पी. ए. उपमुख्याध्यापक श्री बागवान सर, जेष्ठ पर्यवेक्षक श्री शिंदे एस. टी पर्यवेक्षक श्री पाटील बी. के. संस्थेचे सचिव श्री तरकशे सर यांनी गुलाब पुष्प देवुन शुभेच्छा दिल्या. पुढिल विभागस्तरीय स्पर्धेसाठी विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक ज्युनियर काॅलेज विभाग प्रमुख क्रीडा शिक्षक श्री पवार व्ही. एल. क्रीडा शिक्षक श्री दळवे सर यांचे संस्थेचे च्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
