थोड थांबा.. केम प्रमाणे पारेवाडीला पण एक्सप्रेस गाडीला थांबा मिळवुन देतो- खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आश्वासन
करमाळा प्रतिनिधी- केम रेल्वे स्थानकावर हैद्राबाद- मुंबई एक्सप्रेस गाडीला थांबा मिळाला असुन पारेवाडी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची मागणी विचारात घेऊन थांबा द्यावा बाबत दुरध्वनी वरून ॲॅड. अजित विघ्ने यांनी खासदार. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचेशी संपर्क साधला. यावेळी केमला गाडी थांबविण्यासाठी देखिल संघर्ष करावा लागला, प्रसंगी रेल्वे बोर्डाचा राजीनामा देखिल द्यावा लागला, परंतु केम रेल्वे स्टेशन प्रमाणेच पारेवाडी रेल्वे स्टेशन ला देखिल निश्चितपणे थांबा मिळवुन देतो असे ठोस आश्वासन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले आहे. पारेवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या जास्त आहे, त्यामुळे सुरुवातीला ट्रायल बेसीस वर तरी गाडीला थांबा द्यावा अशी विनंती आपण खासदार साहेबांना केल्याची माहिती ॲॅड. अजित विघ्ने यांनी दिली.