करमाळा

त्रिदेव सैनिक सेवा संघ महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी पोमलवाडी येथील बाळासाहेब आनंदराव पाटील यांची निवड

केत्तूर ता.2 त्रिदेव सैनिक सेवा संघ महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी पोमलवाडी येथील बाळासाहेब आनंदराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.संघटनेचे अध्यक्ष संदीप वामन लगड यांनी ही निवड केली आहे सैनिकांच्या परिवाराच्या भल्यासाठी आपले विचार व संघटन मजबुतीसाठी योगदान स्तुत्य आहे. संघटना मोठी व बळकट करण्यासाठी आपल्यासारख्या वैचारिक विद्यासंपन्न व संयमी नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे आपली उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे त्यांनी कळविले आहे.उपाध्यक्षपदी बाळासाहेब पाटील यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांची अभिनंदन करून कौतुक केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!