करमाळा शहरात हिंदु मुस्लीम बांधवात ऐक्य निर्माण करणारे कासम मोहम्मद सय्यद उर्फ सय्यदभाई पत्रकार यांचे दुःखद निधन…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील जामा मशिदीचे विश्वस्त व मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते कासम मोहम्मद सय्यद उर्फ सय्यदभाई पत्रकार (वय-६२) यांचे रविवार दि. २० रोजी दुपारी दोन वाजता ह्रदयविकाराने निधन झाले.
कासम सय्यद उर्फ सय्यद भाई पत्रकार हे शहरातील नामवंत पत्रकार होते. करमाळा शहरात हिंदू-मुस्लिम सलोखा ठेवण्यासाठी त्यांचा सतत पुढाकार होता. सय्यद भाई यांच्या संकल्पनेतूनच दरवर्षी शहरातील सर्व गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीवर जामा मशिदीतून पुष्पवृष्टी ची पंरपंरा सुरु केली
सय्यद भाई हे करमाळा एस.टी. स्टँड समोर जमजम रसवंतीगृहचे मालक होत त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वधर्मियात दु:ख व्यक्त होत आहे.
