सोलापूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मा.राधाकृष्ण विखेपाटील साहेब मुख्यमंत्री यांना महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेकडून आरोग्य सेविकांच्या मागण्यांबाबतचे निवेदन
करमाळा प्रतिनिधी दि.25/12/22.रोजी ,आदिनाथ साखर कारखाना 27 वा गळीत हंगाम मा .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभहस्ते उदघाटन झाले,यावेळी सोलापूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मा.राधाकृष्ण विखेपाटील साहेब यांना महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेकडून आरोग्य सेविकांच्या मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले,यावेळेस संघटनेचे पदाधिकारी सुप्रियाताई जगताप, कविताताई चव्हाण ,शितलताई साळवे, सुरेखा सावरे उपस्थित होत्या. तसेच मुख्यमंत्री साहेब यांना त्यांचे सचिव यांचेमार्फत आरोग्य सेविकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पालकमंत्री साहेबांकडून मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
