Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

महायुतीचे सरकार सर्वसामान्य जनतेचे कल्याण करणारे सरकार असून विधानसभेला आमदार संजयमामाना पुन्हा एकदा ‌आमदार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे-सौ.दिपालीताई पांढरे

करमाळा प्रतिनिधी महायुतीचे सरकार सर्वसामान्य जनतेचे कल्याण करणारी सरकार असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला भगिनींनी सरकारने दिलेली भाऊबीज असुन पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असून संजय मामा शिंदे यांना आमदार करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा निरीक्षक सौ दिपालीताई पांढरे यांनी व्यक्त केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या जनसंवाद दौऱ्याअंतर्गत आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय,करमाळा येथे राष्ट्रवादी महिला कोंग्रेस प्रदेश उपाध्यक्षा तथा सोलापुर जिल्हा निरीक्षक सौ.दिपालीताई पांढरे यांनी जिल्हा जनसंपर्क दौरा करमाळा पासुन सुरूवात केली. आई कमलाभवानी मातेचे सर्व सहकारी बंधु-भगिनी सोबत मनोभावे दर्शन घेतले.आमदार संजयमामा शिंदे संपर् कार्यालय,करमाळा येथे राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीच्या करमाळा तालुक्यांतील सर्व पदाधिकारी यांची बैठक झाली.तहसिल कार्यालय,करमाळा आवारात आमदार संजयमामा शिंदे यांनी महिला भगिनीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना संदर्भात सुरु केलेल्या कार्यालयास सदिच्छ भेट दिली.
तहसिल कार्यालय येथे,करमाळा आवारात आमदार संजयमामा शिंदे यांनी महिला भगिनीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना संदर्भात सुरु केलेल्या कार्यालयास त्यांनी सदिच्छ भेट दिली.
याबरोबरच मौजे पाडळी ता.करमाळा येथील सौ.पुजाताई जगताप यांची राष्ट्रवादी महिला कोंग्रेस ता.सरचिटणीस पदी निवड करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच बोरगावचे माजी सरपंच विनयकाका ननवरे यांच्या सुविद्य पत्नी साँफ्टवेअर इंजिनिअर सौ.हर्षालीताई विनय ननवरे यांची बोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे व त्यांचे सहकारी यांचे काम चांगले असून आमदार संजय मामा यांना मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास सौ दिपालीताई पांढरे यांनी व्यक्त केला आहे.यावेळी राष्ट्रवादी महिला कोंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.वर्षाताई शिंदे,राष्ट्रवादी महिला कोंग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा सौ.उज्वलाताई पाटील,राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे ता.अध्यक्ष .भरतभाऊ आवताडे,राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष तथा बार्शी विधानसभा निरीक्षक आशपाकभई जमादार,राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे ता.कार्यध्यक्ष .सुजिततात्या बागल,राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ देशमुख,राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे ता.प्रवक्ते ॲड.अजित विघ्ने,राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे ता.उपाध्यक्ष .सोमनाथ रोकडे,राष्ट्रवादी कोंग्रेसचे शहरकार्याध्यक्ष बापु तांबे,राष्ट्रवादी महिला कोंग्रेसच्या ता.अध्यक्षा सौ.शितलताई क्षिरसागर,राष्ट्रवादी महिला कोंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ.नंदिनीताई लुगांरे,राष्ट्रवादीचे सतिष पवार,कृष्णा डोंगरे,अमोल चाळक उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group