Tv 9 मराठीचे पत्रकार शितलकुमार मोटे यांची करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या करमाळा तालुका उपाध्यक्षपदी फेरनिवड
करमाळा प्रतिनिधी करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची कार्यकारणी तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी जाहीर केली टीव्ही नाईन मराठीचे पत्रकार शितलकुमार मोटे यांची करमाळा तालुका उपाध्यक्षपदी पुन्हा फेर निवड करण्यात आली आहे. शितलकुमार मोटे यांना सदर निवडीचे पत्र तालुका अध्यक्ष दिनेश मडके यांच्या हस्ते देण्यात आले. शितलकुमार मोटे हे पाथुर्डी गावचे रहिवासी असून संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल करत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या शितलकुमार मोटे यांनी डिजिटल मीडियाचे चांगले काम केल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. यावेळी पत्रकार तालुका कार्यवाह नितीन झिंजाडे,पत्रकार तालुका सोशल मीडिया प्रमुख हर्षवर्धन गाडे,पत्रकार तुषार जाधव आदि पत्रकार यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ,दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव भोसले,दलित सेनेचे जिल्हा सचिव एल डी कांबळे,पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांनी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या असून निवड झाल्याबद्दल शैक्षणिक,सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
