Sunday, April 20, 2025
Latest:
Uncategorized

ग्रामपंचायतीचे मासिक सभेला ग्रामस्थांनाही उपस्थित राहता येईल परंतु ठराव आणि मत मांडण्याचा अधिकार सरपंच आणि सदस्यांनाच -ॲड. अजित विघ्ने.

 

करमाळा प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाने नुकताच नवीन आदेश काढला असुन, ग्रामपंचायत अधिनियम-१९५९ मधील तरतुदी प्रमाणे मासिक सभेत ग्रामस्थांनाही उपस्थित राहता येणार असलेबाबत स्पष्ट केले आहे. याबाबत आम्ही करमाळा येथील विधिज्ञ अॅड. अजित विघ्ने यांना विचारले असता, त्यांनी या बाबत स्पष्टीकरण दिले.*ग्रामपंचायत अधिनियमा प्रमाणे ग्रामपंचायतीला मासिक सभा, ग्रामसभा घेण्याचा अधिकार असुन, दोन्ही सभांना ग्रामस्थांना उपस्थित राहता येणार आहे, परंतु ग्रामस्थांना ग्रामसभेत जसा प्रत्यक्ष सहभाग घेता येईल तसा प्रत्यक्ष सहभाग, मत मासिक सभेत नोंदवता येणार नाही. कायद्याने फक्त मासिक सभांनाही उपस्थित राहता येईल व प्रत्यक्ष कामकाज पाहता येईल. ग्रामपंचायत कायदयानुसार विशेष सभा व तातडीच्या सभा देखिल घेण्याचे अधिकार ग्रामस्थांना आहेत. मासिक सभेला ग्रामस्थांना उपस्थित राहता येईल..परंतु कोणी याचा विपर्यास करून मासिक सभा मधे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचे अधिकार ग्रहण करू शकणार नाहीत-

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group