करमाळा येथील किल्ला विभागातील जागृत देवस्थान खोलेश्वर महादेवाची नंदीवरून 22 फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणुक
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील किल्ला विभाग येथील जागृत देवस्थान खोलेश्वर महादेवाची सालाबाद प्रमाणे ह्यावर्षी ही श्री खोलेश्वर महादेवाच्या नंदीची खांद्यावरुन सवाद्य भव्य मिरवणूक फाल्गुन शु. तृतिया दि. २२\०२\२०२३ रोजी सायंकाळी 5.55 मि श्री खोलेश्वर मंदिरापासून निघणार आहे.
सदर मिरवणूक महादेव मंदिर किल्ला वेस येथून निघणार असून मिरवणुकीचा मार्ग किल्ला वेस, फुलसौंदर चौक, जय महाराष्ट्र चौक, गुजर गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, दत्त पेठ, सुभाष चौक, राशीन पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ते किल्ला वेस महादेव मंदिर किल्ला वेस या मार्गे निघण्यात येणार आहे. नंदीचे मानकरी खांदेकरी व आरती मंडळाचे सर्व सदस्य व करमाळा शहरातील सर्व भाविक भक्त यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.तरी भाविक भक्तानी या मिरवणूकीसाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन खोलेश्वर आरती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
