*करमाळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा युवा सामाजिक कार्यकर्ते अभिषेक आव्हाड यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर*
*करमाळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा युवा सामाजिक कार्यकर्ते अभिषेक आव्हाड यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर*
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केलेल्या जनसेवेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अभिषेक आव्हाड यांनी हातावर पोट असलेल्या दोनशे वीस कुटुंबाना 5 किलो गहू,5किलो तांदूळ वाटप तसेच लाॅकडाऊन काळापासून आजपर्यंत दोनशे लोकांना घरपोच शिवभोजन उपलब्ध करून दिले असून त्यांचे हे कार्य आजमितीला चालू आहे. लाॅकडाऊन काळात करमाळा तालुक्यात वेगवेगळ्या भागात अडकुन पडलेल्या लोकांना त्यांच्या मुळ गावी सोडवण्यासाठी मदत केली असून रोजगार नसलेल्या शंभर कुटुंबाना किराणा मालाचे वाटप करून अनेक लोकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी गेल्या वर्षभरापासुन केलेल्या कामाची दखल घेऊन करमाळा शहरातील तरुण युवा सामाजिक कार्यकर्ते शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक अशोक आव्हाड यांना कोराना महामारी काळातील केलेल्या कार्याचा सन्मान म्हणुन छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार श्री कल्याणजी जाना (संस्थापक/ चेअरमन – दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स. मुंबई व सोनम पाटील व्हाईस प्रेसिडेंट दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स मुंबई यांच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे . या पुरस्काराचे वितरण – 24 मे रोजी रंगशारदा ऑडिटोरिम, बांद्रा वेस्ट, मुंबई येथे होणार आहे.अभिषेक आव्हाड यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल करमाळा तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
