जयप्रकाश बिले सर यांचे भाच्चे डाॅ.रविंद्र पवार यांनी केली पाच वर्षाच्या रशियन मुलाची हृदय शस्त्रक्रिया
करमाळा प्रतिनिधी भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य जयप्रकाश बिले सर यांचे भाच्चे डॉक्टर रवींद्र पवार यांनी कोल्हापूर येथील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये पाच वर्षीय रशियन बाळाची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. बाळाला ॲट्रीयल सेप्टल डिफेक्ट या आजाराचे निदान झाले होते. या आजारात फुफ्फुसात अतिरिक्त रक्तप्रवाह होतो. त्यामुळे दम लागणे, घाम येणे ,लवकर थकवा येणे, वजन न वाढणे ,असे लक्षणे दिसून येतात ही छिद्र लहान असतील तर बाळांना त्रास होत नाही पण मोठी असेल तर छातीमध्ये वारंवार संसर्ग होतो याबद्दल डॉक्टर रवींद्र पवार म्हणाले की या रोगात हृदयाच्या वरच्या दोन्ही कप्प्यामधील पडद्याला जे छिद्र असते त्या विशिष्ट चक्तीने बंद करण्यात येते या प्रक्रियेत विना शस्त्रक्रिया मांडीच्या नसेतून एका छोट्याशा नळीद्वारे चक्ती हृदयाच्या आतपर्यंत पोहोचण्यात येते. या चक्कतीच्या मदतीने एएसडी बंद करण्यात येते. ही चकती शरीराचे एक भाग बनवून जाते ही प्रक्रिया कॅथ लॅबमध्ये करण्यात आली. यावर अवघ्या 25 मिनिटात यशस्वीरित्या उपचार करण्यात आले व दुसऱ्या दिवशी बाळाला घरी सोडण्यात आले. हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत शहा म्हणाले की हॉस्पिटलमधील हृदयरोग विभाग पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर आहे. सर्व सुविधानियुक्त व आधुनिक कॅथलॅबमुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सर्व वयोगटातील रुग्णांसाठी सहज करता येतात असे त्यांनी सांगितले.
