कुर्डूवाडीतून व छत्तीस गावांतुन दिग्विजय बागल यांच्या धनुष्यबाणाला लीड मिळणार -जिल्हाप्रमुख महेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी
कुर्डूवाडी व या छत्तीस गावात शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असून या भागातून दिग्विजय बागल यांच्या धनुष्यबाणाला लीड मिळेल असा विश्वास जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केला
कुर्डूवाडी शहरात दररोज शिवसैनिकांच्या वतीने पदयात्रा व होम टू होम प्रचार होत आहे.जिल्हाप्रमुख चिवटे दररोज या पद यातील सहभागी होत आहेत.पदयात्रा झाल्यानंतर कुर्डूवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात चिवटे बोलत होते.यावेळी युवा नेते गौरव कोलते,रिंकू घुमरे शहर प्रमुख समाधान दास,सागर कोल्हे ,रोहन बलाकसे ,महिला आघाडी प्रमुख मोरेव शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.यावेळी बोलताना शहरप्रमुख समाधान दास म्हणाले की कुरूडवाडी शहरातून धनुष्यबाणाला 5000 मते मिळतीललाडकी बहीण योजनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याकडे बघून लोक मतदान करणार आहेत.यावेळी बलाक्षे म्हणाले कीमुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून रुग्णांना एक कोटी रुपयांचा निधी धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत.एकनाथ शिंदे यांना पुन्हामुख्यमंत्री करण्यांसाठी दिग्विविजय बागल यांना विधानसभेत पाठवण्यासाठी धनुष्यबाणाला निवडून द्यावी असे आवाहन केले आहे.
