Friday, April 25, 2025
Latest:
Uncategorized

रासायनिक खताच्या किमती वाढल्या ही अफवा – महेश चिवटे

करमाळा (प्रतिनिधी )

रासायनिक खताच्या किमती वाढल्या अशा खोट्या बनावट बातम्या देऊन शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार केले जात असून रासायनिक खताचे कोणतेही दर वाढले नाही अशी माहिती महाराष्ट्र डीलर असोसिएशनची संचालक महेश चिवटे यांनी दिली आहे.युरिया खताचे पोते 266 रुपयाला असून गेली सात वर्षापासून खताची हीच किंमत आहे20 20 0 13या खताची विक्री किंमत बाराशे रुपये असून या खतात सुद्धा दर वाढ झालेली नाही.16 16 16 या खताचे 50 किलो पत्त्याची किंमत बाराशे पन्नास रुपये आहे मात्र बातम्यांमध्ये या पोत्याची किंमत 1470 रुपये झाली अशी माहिती दिली जात आहेडीएपी सम्राट या 50 किलो खताची गोणी 1350 रुपयाला आहे यात कोणतीही दरवाढ झालेली नाही10 26 26 या खताची गोणी 1470 ला आहेसुपर फॉस्फेट गोळी 570 रुपयाला 50 किलोचे पोते आहे.रासायनिक खताच्या कोणत्याही किमती वाढलेल्या नसून सर्व खत विक्रेत्यांकडे याच दराने विक्री सुरू आहेनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही फेक बातम्या सोशल मीडियावर टाकून रासायनिक खताचे दर वाढले अशा बातम्या देऊन शेतकऱ्यात भ्रम तयार केला जात आहे.या चुकीच्या बातम्या वर विश्वास ठेवू नये असे आव्हान खत विक्री ते संघटनेच्यावतीने महेश चिवटे करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group