शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्री ना.दत्तात्रय मामा भरणे मामांना करमाळ्यात शिक्षकांचे निवेदन
करमाळा प्रतिनिधी १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचायांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत व शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत मा.नामदार श्री.दत्तात्रय मामा भरणे साहेब, क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आलेराजस्थान, छत्तीसगढ, झारखंड व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू झाली आहे. कर्नाटकमध्ये सुध्दा लवकरच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मागील ७ वर्षांपासून प्रयत्न करत आहे. १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे संघटनेच्या वतीने काढण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत अनेक कर्मचारी हिताचे निर्णय घेतले आहेत. याचपध्दतीने सध्याच्या काळातील कर्मचाऱ्यांचा सर्वात जास्त जिव्हाळ्याचा प्रश्न जुनी पेन्शन असून या प्रश्नावर सरकारने तातडीने सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा. महाराष्ट्रातील ५ लाख कर्मचाऱ्यांना यांचा लाभ मिळणार आहे. निश्चितच कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करणारा हा निर्णय घेतला जावा यासाठी आपण पुढाकार घ्यावा.त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष २००५-०६ मधील शिक्षण सेवक सरळसेवा भरती प्रक्रियेतील दोन्ही जाहिराती स्वतंत्र नसून त्या एकमेकांशी संलग्न (Attached) असलेने त्या दोन्ही जाहिरातीमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.आणि सातव्या वेतन आयोगातील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीतील (चटोपाध्याय) त्रुटी निराकरण करण्यात यावे याबाबत निवेदन देण्यात आले त्यावेळी सोलापूर जिल्हा पेन्शन संघटनेचे जिल्हा नेते श्री तात्यासाहेब जाधव सर, श्री मधुकर शिंदे सर, श्री विक्रम राऊत सर उपस्थित होते.
