ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्राध्यापक महेश निकत यांचा यशवंत गौरव पुरस्काराने सन्मान
करमाळा प्रतिनिधी
ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा. महेश निकत यांचा ‘यशवंत गौरव’ पुरस्काराने सन्मान झाले आहे. बारामती (काऱ्हाडी) येथील श्री सिद्धिविनायक मित्र मंडळच्या वतीने राधाबाई दादासाहेब खंडाळे यांच्या स्मरणार्थ व दादासाहेब चंद्रकांत खंडाळे यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त हा सन्मान करण्यात आला. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा गौरव झाला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी सहसचिव अनिल गुंजाळ, कृषी उद्योग मुल शिक्षण संस्थाचे (काऱ्हाटी) संचालक श्री. दस्तगीर, संचालक श्री. वाबळे, संस्थेचे प्रशासक श्री. निर्मल उपस्थित होते. यावेळी माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
