कोंढेज परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा – भाजपा अध्यक्ष गणेश चिवटे यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी जेऊर सब स्टेशन येथून कोंढेज परिसरासाठी जाणारी विद्युत वाहिनी रेल्वे पुलाखाली खराब झाल्यामुळे कोंढेज परिसरातील विद्युत पुरवठा हा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद होता, त्यामुळे कोंढेज व परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत आहे , तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,जनावारांचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी मा.अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांना केली, यावेळी सांगळे साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस श्याम सिंधी, नंदकुमार शेरे उपस्थित होते,
