रहेनुमा चॕरिटेबल ट्रस्टच्यावतीने न्यु इरा इंग्लिश मिडीयम स्कूल करमाळा शहर येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी न्यू इरा इंग्लिश मिडीयम स्कूल करमाळा शहर येथे 74 वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष करमाळा मुस्लिम समाजातील समाजसुधारक व करमाळा अर्बन बँकेचे संचालक मा कलिम काझी ( सर ) , माजी नगराध्यक्ष शौकत भाई नालबंद, करमाळा मुस्लिम चे जमियत उलेमा हिंद चे अध्यक्ष मौलाना मोहसीन, न्यू इरा इंग्लिश मिडीयम स्कूल चे अध्यक्ष अजिम मोगल, जामा मस्जिद चे विश्वत जमिर भाई सय्यद करमाळा मुस्लिम समाजातील युवा नेते मुस्तकीम भाई पठाण व मुस्लिम समाजातील लोक व शालेय विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. यावेळी गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ट्राफी व प्रमाणपत्र देऊन मा कलिम काझी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व बक्षिसे देण्यात आली आहे यावेळी विद्यार्थ्यांना व उपस्थित लोकांना मार्गदर्शनपर पर भाषण करताना त्यांनी सांगितले की मुस्लिम समाजातील मुला- मुलींनी
शिक्षण घेतले पाहिजे हे स्पर्धेचे युग असुन यामध्ये टिकण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी शिक्षणामध्ये रुची दाखवुन सर्व क्षेत्राचा गांभीर्याने अभ्यास करून भरपूर मेहनत घ्यावी व यासाठी पालकांनी सुद्धा आपल्या मुला मुलींना शिक्षण घेण्यासाठी भाग पाडावे . पालकांनी वेळ प्रसंगी मुलांच्या शिक्षणासाठी जास्त कष्ट घेऊन मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उपलब्ध करून द्यावे व मुलांनी सुद्धा आई वडिलांच्या कष्टाचे चीज करावे.उत्तम शिक्षण हे तुमच्या दारिद्र्य,अज्ञानपणा दुर करणारे आहे. जे मुलं मुली हुशार व गुणवंत आहे परंतु आर्थिक अडचणी आहेत अशा मुलं मुलींना वेळ प्रसंगी आर्थिक मदत केली जाईल परंतु त्यांनी शिक्षण सोडून देऊ नये.असे आवाहन केले आहे.
