प्रचार संपला- निकाल झाला आता गावाचे विकासासाठी हातात हात घालुन कामे करा- श्री. दादासाहेब निकम
केत्तुर(प्रतिनिधी)- करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील महत्वाची ग्रामपंचायत केत्तुर येथील पंचवार्षिक निवडणुकीत सर्व गटातटांनी एकत्र येत दोन पॅनलमधे निवडणुक लढली . किर्तेश्वर ग्रामविकास परिवर्तन पॅनल चे प्रभाग क्रमांक तीन आणि चार मधील पाच सदस्य अविरोध निवडले गेले असुन, प्रभाग क्रमांक-१ आणि प्रभाग क्रमांक-२ मधे आणि सरपंच पदासाठी किर्तेश्वर ग्रामविकास परिवर्तन पॅनल व किर्तेश्वर ग्रामविकास आघाडी यामधे सरळ सामना झाला त्यामधे माजी सभापती बापुसाहेब पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक राजेंद्रसिंह पाटील, माजी सरपंच देवराव नवले, संतोष पाटील माजी संचालक आदिनाथ सह . साखर कारखाना,माजी सरपंच अँड. अजित विघ्ने, मकाई कारखान्याचे कार्य. संचालक हरिश खाटमोडे- पाटील, माजी उपसरपंच संतोष निकम , लालासो कोकणे प्रणित किर्तेश्वर ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सचिन वेळेकर यांचे सह दहा जागेवर वर्चस्व प्रस्थापित केले असुन, माजी सरपंच उदयसिंह पाटील,विलास कोकणे यांचे पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक २ मधील एक जागा श्री. दादासाहेब निकम यांनी किर्तेश्वर आघाडी कडुन निवडुन आणली असुन, आदिनाथचे माजी संचालक संतोष पाटील यांचे सुपुत्र सुजित पाटील यांनी निवडणुक जिंकुन ग्रामपंचायतीत एण्ट्री केली आहे तर माजी आमदार रावसो पाटील यांचे सुनबाई सौ. राजलक्ष्मी उदयसिंह पाटील यांचा मात्र प्रभाग दोन मधुन धक्कादायक पराभव झाला आहे. केत्तुर येथील निवडणुक एकंदरीत रंगतदार होऊन देखिल खेळीमेळीत पार पडली असुन, आज ज्येष्ठ नेते दादासाहेब निकम यांचे निवासस्थानी सर्व नुतन सदस्य व सरपंच यांचा सन्मान निकम परिवाराचे वतीने करण्यात आला.याप्रसंगी -गावाचे विकासा करीता यापुढे सर्वांनी एकदिलाने कामे करावीत असे सुचना देऊन अभिनंदन करण्यात आले.
नुतन सरपंच व सदस्य खालील प्रमाणे-
१) श्री. सचिन विठ्ठल वेळेकर- सरपंच
२) श्री शहाजी मारुती पाटील- सदस्य( अविरोध)
३) श्री. बबन ईश्वर साळवे- सदस्य( अविरोध)
४) श्री रामहरी कोंडीबा जरांडे- सदस्य( अविरोध)
५) सौ. शुभांगी रविंद्र विघ्ने- सदस्या( अविरोध)
६) सौ. प्रियांका प्रशांत नवले- सदस्या( अविरोध)
७) श्री. भास्कर भगवान – सदस्य ( प्रभाग-१)
८) सौ. सुवर्णा हनुमंत गुलमर- सदस्य ( प्रभाग-१)
९) सौ. शोभा अंबादास कानतोडे- सदस्य( प्रभाग-१)
१०) सौ. पुजा दत्तात्रय कनिचे- सदस्य( प्रभाग-२)
११) श्री. सुजित संतोष पाटील- सदस्य( प्रभाग-२)
१२) सौ. कमल दादासाहेब पवार- सदस्य( प्रभाग-२)